कळब /प्रतिनिधी- 

महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जातीच्या यादीत क्रमांक 36 वर असलेल्या अन्यायग्रस्त धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलती तात्काळ मिळाव्यात अशी मागणी आपल्या निवेदनाद्वारे करण्यात आली 

दि. २८ रोजी धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे नमुद केले  की महाराष्ट्र राज्यामध्ये खूप दिवसापासून धनगर समाज एसटी आरक्षणासाठी संघर्ष करीत आहे धनगर एसटी आरक्षणाचे अंमलबजावणी करून धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणून न्याय द्यावा राज्यात धनगड अस्तित्वात नाहीत जे आहेत ते धनगर च आहेत पदोन्नती पात्र एससी एसटी ओबीसी एनटी हिजेएनटी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, मेगा भरती तात्काळ सुरू करण्यात यावी, 1000 कोटीची योजना निधी वितरित करून तात्काळ अंमलबजावणी करावी, यासह अनेक मागण्यांचे निवेदन  धनगर समाजाच्या वतीने देण्यात आले, या निवेदनावर बाळासाहेब शिंपले, अॅड. विश्वजीत दुगाणे,अॅड. आभिमन्यू लोकरे, आकाश पारेकर,  रोशन वाघमोडे, शिवाजी शेंडगे, किरण पांनढवळे, सागर पारेकर,  अमोल शेडगे, महेश हारकर, संतोष घाटोळे,  डॉ. रामकृष्ण लोढे अक्षय पारेकर, खंडू शिंपले आदी जनांच्या स्वाक्षऱ्या आहेत 

 
Top