उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम,2020 प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,उस्मानाबाद यांनी प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यामधील कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,उस्मानाबाद येथील व जिल्हा आयुष अधिकारी यांचे नियंत्रणाखालील डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी यांची उपलब्धता, उपस्थिती, नियुक्ती इ. बाबींच्या समन्वयासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती चे आदेश जारी केले आहेत.
समन्वय अधिकारी यांचे नाव व पदनाम पुढीलप्रमाणे आहेत:- सचिन गिरी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जि. का. उस्मानाबाद.नियुक्त समन्वय अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज करावे.अधिष्ठाता,शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद व जिल्हा आयुष अधिकारी, जि. प. उस्मानाबाद यांचेशी समन्वय साधून त्यांचे अधिनस्थ उपलब्ध असलेल्या डॉक्टर्स, विद्यार्थी, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी व इतर वैद्यकीय कर्मचारी यांची संख्या, त्यापैकी कोविड-19 चे कामकाजासाठी नियुक्त केलेले डॉक्टर्स, विद्यार्थी, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी यांची संख्या, कोविड-19 साठी नियुक्ती नसलेले डॉक्टर्स, विद्यार्थी,शिक्षक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या इ. बाबींचा आढावा घेणे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, उस्मानाबाद येथील विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी व इतर वैद्यकीय कर्मचारी यांचेपैकी ज्यांची CCC, DCH, DCHC येथे कोविड-19 चे कामकाजासाठी नियुक्ती करता येईल. याची तपासणी करणे व त्यानुसार नियुक्त्या करणेच्या कामकाजात समन्वय साधणे.शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद येथील CCC केंद्रांची संख्या,तेथे दाखल असलेल्या रुग्णांची संख्या इ.बाबींचा आढावा घेणे व तेथील CCC केंद्रांना   DCHC मध्ये रुपांतरित करण्यासाठी अधिष्ठाता,शासकीय आयुर्वेद महाविद्यालय यांचेशी समन्वय करणे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 कोविड उपाययोजना नियम 2020 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील. असे आदेशात नमुद केले आहेत.
x
 
Top