उमरगा/ प्रतिनिधी-
 गेल्या अनेक वर्षापासून सीमावर्ती भागात असलेल्या तालुक्यातील डिग्गी प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून कर्नाटक सिमेवरील शेवटचे गाव कोणताही आजार झाला तर डिग्गी व परिसरातील गावातील रुग्णांना व नातेवाईकांना शहरात उपचारासाठी जावे लागत असल्याने माजी खासदार रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गावातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने सहा महिन्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण सेवेत कार्यरत झाले आहे.
तालुक्यातील डिग्गी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले असलेतरी त्यात वैद्यकीय सोयीसुविधा अपुऱ्या असल्याने उपचारासाठी लहान मुलांचे लस, कुत्रा चावल्याची लस उपलब्ध नसल्याने आणि वैद्यकीय औषधे ठेवण्यासाठी सामुग्रीची सुविधा नसल्याने आरोग्य केंद्रात दाखल रुग्णांना परत उमरगा, मुळज, येणेगुर आदी ठिकाणी यावे लागत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सिद्धाराम हत्तरगे यांना येथील नागरीकांनी अनेक विषयावर प्रश्न उपस्थित करुन चर्चा केली. एका कुत्रा चावल्याने आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नाही म्हणून येणेगुर केंद्र किंवा उस्मानाबादला उपचारासाठी जाणे आवश्यक होते. सिद्धाराम हत्तरगे यांनी प्रदिप मदने यांना मोबाईलवरून समस्याची माहिती दिल्यानंतर येणेगूर केंद्राचे डॉ जळकोटे, दिपक हिप्परगे याच्या सहकार्यातून रुग्णास सहकार्य मिळाले. दरम्यानच्या वेळी डिग्गीच्या केंद्रात सुविधा उपलब्ध नसल्याने या भागातील रुग्ण व नातेवाईकांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य महमदरफिक तांबोळी याच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या बाबत चौकशी करुन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे यांना फोन करुन समस्या सांगितल्या सध्या कोरोना आजारामुळे शहरातील उपजिल्हा रुग्णालय कोवीड रुग्णाकरीता राखीव असल्याने अन डिग्गी येथील आरोग्य केंद्रात कोणतीही लस आणि साधन साम्रुग्री नसल्याने गंभीर रुग्णास अन्यत्र धावपळ करावी लागत असून तात्काळ आरोग्य केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केल्यानंतर डॉ हनुमंत वडगावे यांनी आश्वासन दिले.मंगळवारी (दि ०८) तातडीने डिग्गी प्राथमिक आरोग्य केंद्रास सर्व प्रकारचे लस व मशनरी उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सदस्या डॉ शालिनी जिवनगे, रफीक तांबोळी यांच्या प्रयत्ना मुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातीत प्रश्नांची सोडवणुक झाल्याने रुग्ण, नातेवाईक व परिसरातील नागरिकां तून समाधान व्यक्त केले जात आहे.
 
Top