परंडा / प्रतिनिधी -
तालुक्यातील माहे आँक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये अतिवृष्टी अवेळी पाऊस चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बाधित वाटप करण्यात आलेल्या क्षेत्रास वगळून उर्वरित दुष्काळामुळे बाधित क्षेत्रास २ हेक्टर मर्यादेत खरिप हंगाम २०१९ दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांना करण्यात संदर्भात नायब तहसीलदार पांडुरंग इनामदार यांना शिवसेनेचे युवा नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगाम २०१९ मध्ये परंडा तालुक्यात अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. सदर हंगामात उडीद, मुग, तुर, मका, सोयाबीन, कांदा व इतर पिकांची पेरणी करण्यात आली होती.दुष्काळामुळे बाधित होवुन सदर पिकांपैकी उडीद, मुग, सोयाबीन हि कमी कालावधीची पिक अल्यल्प पावसामुळे करपल्यामुळे बाधित झाल्यामुळे सदर शेतक-यांनी आपल्या शेतातील पिके सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत काढुन टाकली होती. माहे ऑक्टोंबर नोव्हेंबर २०१९ मध्ये अतिवृष्टी,अवेळी महाचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतक-यांचे शेतातील उभे असलेले पिके मका,कांदा व इतर उभ्या पिकांचे पंचनामे करण्यात येवुन बाधित जिरायत व बागायत क्षेत्रास प्रति हेक्टर ८ हजार रुपये व बहुवार्षिक फळ पिकास प्रति हेक्टर १८ हजार रुपये प्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादेत परंडा तालुक्यात एकुण क्षेत्र ८१३९ हेक्टर या क्षेत्रास एकुण खातेदार संख्या १६ हजार ८५७ खातेदार यांचे खात्यावर रक्कम ६ कोटी ८६ लाख रूपये वाटप करण्यात आले होते. सदर वाटप करण्यात आलेल्या शेतकरी खातेदार यांचे नावे असलेल्या क्षेत्रापैकी २ हेक्टर मर्यादेत वाटप करण्यात आलेले क्षेत्र वगळता सदर खरिप हंगाम २०१९ दुष्काळामुळे बाधित शेतक-यांचे उर्वरित क्षेत्र हे दुष्काळी अनुदान पासून वंचित राहत आहे.
माहे ऑक्टोंबर नोव्हेंबर२०१९मध्येअतिवृष्टी,अवेळी पाऊस, क्यार व महाचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बाधित वाटप करण्यात आलेल्या एकुण शेतकरी संख्या १६ हजार ८५७ पैकी ९ हजार ८८० शेतक-यांच्या वाटप करण्यात आलेल्या क्षेत्रास वगळून मागणी करण्यात आलेल्या तालुक्यातील ४७ हजार ८२६ शेतक-यांचे क्षेत्र ३५ हजार ६१२ हेक्टर ७४ आर पैकी वरील ९ हजार ८८० शेतक-यांचे ५८२३ हेक्टर १९ या उर्वरीत दुष्काळामुळे बाधित क्षेत्रास २ हेक्टरच्या मर्यादेत अनुदान रक्कम वाटप केल्यास शेतक-यांचे क्षेत्राची लाभ होत नाही. तरी महाचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बाधित वाटप करण्यात आलेल्या क्षेत्रास वगळुन उर्वरीत दुष्काळामुळे बाधित क्षेत्रास हेक्टरच्या मर्यादेत अनुदान तालुक्यातील अंदाजे ५ हजार शेतक-यांना खरिप हंगाम २०१९ चे दुष्काळी अनुदान त्वरीत वाटप करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.नायब तहसीलदार पांडुरंग इनामदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना युवा नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील, राहुल डोके,डॉ.आब्बास मुजावर, प्रशांत गायकवाड,बच्चन डाके, हनुमंत ढोरे,संतोष गायकवाड,दत्ता मेहेर, तुकाराम गायकवाड,आण्णा लोकरे यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.