उस्मानाबाद / प्रतिनिधी-
”One Nation One Ration card” योजनेअंतर्गत दि. 12 सप्टेंबर 2020 रोजी “ राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिवस” जिल्हाधिकारी उस्मानाबाद,अपर जिल्हाधिकारी उस्मानाबाद, जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला.
 केंद्र शासनाच्या पुरवठा विभागाच्या “One Nation One Ration card” योजनेअंतर्गत आंतरराज्य पोर्टेबिलिटी सुविधेचा वापर करून इतर राज्यातील लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रास्तभाव दुकानांमध्ये ई- पॉस मशीनवरील IMPDS सॉफ्टवेअरद्वारे अन्नधान्याचा लाभ घेऊ शकतो, तसेच महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी इतर राज्यात स्थलांतरित असल्यास त्या राज्यातील रास्तभाव दुकानांमध्ये जाऊन सदर योजनेअंतर्गत 12 अंकी शिधापत्रिका क्रमांकाआधारे अथवा आधार कार्ड क्रमांकाचे आधारे अन्नधान्याचा लाभ घेऊ शकतो.
या योजनेतील आंतरराज्य पोर्टेबिलिटी सुविधेचा वापर करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी अन्नधान्याचा लाभ घ्यावा, तसेच महाराष्ट्र राज्यातील नागरिक इतर राज्यात स्थलांतरित असल्यास त्यांचे नातेवाईक यांनी या योजनेतील संबंधितांना माहिती देऊन अन्नधान्याचा लाभ घेणेबाबत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास तहसिलदार गणेश माळी, तहसिल व जिल्हापुरवठा कार्यालयातील कर्मचारी शहरातील रास्तभाव दुकानदार उपस्थित होते.

 
Top