उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
तालुक्यातील बेंबळी येथे कोरोनाला रोखण्यासाठी योगदान कोविड योद्ध्यांचा दणदणित, जंगी सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतच्या वतीने या अभिनंदनिय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सत्तार शेख होते. व्यासपिठावर ग्राम विकास अधिकारी एम. बी. करपे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. रोहित राठोड, हवालदार सचिन कपाळे, पत्रकार अॅड. उपेंद्र कटके, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सलमान शेख, सरचिटनिस राजाभाऊ नळेगावकर, महेश पाटील उपस्थित होते.
बेंबळी येथील लोकसंख्या २० हजारांच्या घरात असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतली आहे. ग्रामपंचायतच्या नियोजनात प्रतिबंधात्मक उपाययोजनाही राबवण्यात आल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय, सामाजिक व पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. अशा १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  यामध्ये खासगी वैद्यकीय सेवा देणारे डॉ. श्रीनिवास पवार, डॉ. सचिन ताडेकर, डॉ. अविनाश गावडे, डॉ. सुधिर झिंगाडे, डॉ. इलियास शेख, डॉ. रॉय यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार कटके, शिंदे, गोविंद पाटील, शितल शिंदे ,कलिम शेख, नितिन पाटील, सद्दाम शेख आदींचा सन्मान करण्यात आला.  यांच्यासह सरपंच सत्तार शेख व ग्रामसेवक करपे, भाजपाचे नेता भास्कर बोंदर यांच्यासह सर्व स्वच्छता कर्मचारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविकांचाही सन्मान करण्यात आला.
 
Top