उस्मानाबाद / प्रतिनिधी-
covid-19 मुळ मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या परीक्षाच झाल्या नाहीत त्यामुळे त्यासाठी घेतलेले परीक्षा शुल्क परत करावं , या प्रमुख मागणीसाठी आज उस्मानाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र इथं कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करीत मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात असे म्हटले आहे की मार्च 2020 नंतरची लायब्ररी , जिमखाना ,स्टडी रूम , होस्टेल , फिस परत करावी, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेशावेळी आकारले जाणारे शुल्क , दहा टक्के भरून प्रवेश द्यावेत, एकूण शुल्कात तीस टक्के शुल्क कमी करण्यात यावे, कोविंड 19 मुळे विद्यार्थी आणि पालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्यामुळे विद्यार्थ्यांना तीन ऐवजी पाच टप्प्यात शैक्षणिक शुल्क भरण्याची परवानगी द्यावी , उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ लवकरात लवकर सुरू करावं , उस्मानाबाद येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र स्थापन करावं या मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने विद्यापीठ उपकेंद्र परिसरात देण्यात आलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश सहमंत्री अंकिता पवार , शहर मंत्री नितेश कोकाटे समर्थ आगळे , मारुती पांचाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी या शैक्षणिक मागण्यांसाठी उपकेंद्र इमारतीसमोर जोरदार निदर्शनेही केली.