तेर / प्रतिनिधी 
गेल्या वर्षभरात क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या तालुका जिल्हा विभागासह राज्य व राष्ट्रीय तसेच मराठवाडास्तरीय मैदानी स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारात मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव व क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांच्या मार्गदर्शनाखाली  उल्लेखनीय कामगिरी करून मैदाने गाजवत तेरसह महाराष्ट्र संत विद्यालयाचा राज्यासह देशपातळीवर नावलौकिक करणा-या   खेळाडूंनी जिद्द, चिकाटी व अभ्यासाच्या जोरावर खेळाच्या मैदाना बरोबरच  मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्ड परिक्षेतही उल्लेखनीय कामगिरी करत आपला दबदबा कायम ठेवला आहे
 यामध्ये निकीता महेंद्र घोगरे ९१.६० , नंदिनी रणजितसिंह चौव्हाण ९०.८० , राधा गोरोबा गोरे ८९.४० , वैष्णवी युवराज इंगळे ८८.४० , अपेक्षा गोरख माळी ७९.४० , प्रतिक्षा रामलिंग केसकर  ७५ .०० , ओंकार बबन नाईकवाडी ८७.६० , अजय उमराव गायके ७२.२० , रोहण सोमनाथ कोळी ७०.०० टक्के गुण मिळवत दहावीच्या बोर्ड परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
 
Top