
बेंबळीत प्रतिबंधित क्षेत्र असतानाही भरला बाजार ; उपाययोजना नियमांकडे नागरिकांचा कानाडोळा हे वृत्त दैनिंक पुरोगामी विचाराचे लोकराज्य मध्ये झळकले होते. या वृत्ताच्या माध्यमातुन संभाव्य धोका वर्तविण्यात आला होता. परंतु हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर गावामध्ये कांही नेतेमंडळी मध्ये नकरात्मक भूमिका आमच्या प्रतिनिधीस पहावयास मिळाली होती परंतु रविवार दि. २ ऑगस्ट रोजी बेंबळी गावात अजून एक कोरोना पॉजीटीव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर संबंधित प्रशासनास जाग आली. त्यांनतर संबंधित प्रशासनाने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करून सोमवार दिं.३ ऑगस्ट रोजी भरविण्यात येणारा बाजार आखेर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित यंत्रनेद्वारे वायरल करण्यात आलेल्या त्या पोस्ट मध्ये बेंबळी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, पंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या पोस्टवर गावचे सरपंच सत्तार शेख यांचे नाव दिसत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावात एकुण पॉजीटीव्ह रूग्ण संख्या २ झाली आहे. त्यामध्ये पुर्वीच्या रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली. तर रूईभर येथील पॉजीटीव्ह रूग्ण संख्या ११ आढळुन आल्याने एकुण रूग्ण संख्या १३ झाली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतच्या वतीने आयुष काढा , मास्क वापराबरोबर थरमल स्कॅंनर व ऑक्सीमीटरने नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा ही जीवाची पर्वा न करता काम करीत आहे. तसेच नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गावातील नागरिकांनी स्वच्छते बरोबर, मास्कचा उपयोग करणे, कोमट पाणी पिणे, आपल्या आरोग्य काळजी घेणे, सोशल डिस्टंसिंग चे आदीचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बेंबळी येथील क्वारंटाईन कक्षात सुविधांचा अभाव
बेंबळी गावात रविवार दि. २ ऑगस्ट रोजी आणखी एक कोरोना पॉजीटीव्ह रूग्ण आढल्यानंतर त्या रूग्णांच्या संपर्कातील नातेवाईकांना जिल्हा परिषद शाळेतील एका कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु या कक्षात कसल्याही प्रकारच्या सुवधा नाहीत. क्वारंटाईन कक्षातील व्यक्तींना जेवणाच्या डब्याची सोय उपलब्ध करून द्यावी व त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्यावी अथवा त्यांना होमक्वारंटाईन करण्यात यावे अशी मागणी होत आहे.