तुळजापूर / प्रतिनिधी-
देशातील मंदीर उघडे मग महाराष्ट्रातील का नाहीत असा सवाल करुन आँगस्ट च्या पहिला आठवड्यात मंदीर मशीद चर्च न उघडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराच आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला.
महाराष्ट्रातील मंदिर, मशीद चर्च स्थळे सुरु करा या मागणीसाठी राज्यातील प्रमुख देवस्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मंदीराच्या राजेशहाजी महाध्दारसमोर भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टंन्स पाळून शनिवार दि. 29 रोजी ढोल वाजवुन घटांनाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा आ राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, युवा नेते विनोद गंगणे, आनंद कंदले, नागेश नाईक, विहिंपचे प्रा. काकासाहेब शिंदे, पाठक कुलकर्णी उपस्थितीत होते. तसेच तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, अणदूर , काटी, सावरगाव, मंगरुळ, आपसिंगासह अनेक गावात भाजपा व हिंदूत्ववादी संघटनांनी आंदोलन केले.