परंडा /प्रतिनिधी : -
परांडा तालुक्यातील मौजे तांबेवाडी शिवारातील राजु बाबासाहेब मस्तुद यांचेसह कुटुंबास मारहान करुन सर्वांना बांधुन ठेवुन त्यांचे मालकिच्या शेळ्या बोकड व पाटी असे एकुन ४५ शेळ्या व घरातील सोन्याचे दागीने, एकुन रक्कम सहा लाख दोन हजार सहाशे रुपयांची चोरी करुन घेऊन जाणारा पिक अप भुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साळवे  व  कर्मचारी यांनी पकडुन परंडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की तांबेवाडी शिवारातील बाबासाहेब मस्तुद यांच्या मालकीच्या ४५ शेळ्यासह घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असे मिळुन एकुन सहा लाख दोन हजार सहाशे रुपयांची चोरी करुन पळुन जाणारा पिक अप भुम पोलीसांनी पकडुन परंडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला. चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेला पिक अप
क्र.एम एच २५.ए.जे.०२११ व चोरी झालेल्या ४५ शेळ्या व पिक अप चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले असुन गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असुन त्यांचा शोध सुरु आहे तसेच चोरीस गेलेले सोने रोख रक्कम मिळालेली नाही.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन परंडा येथे गुन्हा दाखल दाखल असुन पुढील तपास परांडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने हे करीत आहे.
 
Top