उस्मानाबाद दि.२५ (प्रतिनिधी) - कोरोना कोरोना रुग्णांची संख्या आज दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत १०४ ने वाढून ४ हजार ८७३ वर पोहोचली आहे. आज आलेल्या अहवालात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६२ व रॅपिड अॅन्टीजन तपासणीद्वारे ४२ रुग्ण बाधित झालेले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड सेंटर यांच्याकडे २३२ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तर अॅटीजन तपासणीद्वारे देखील तपासणी करण्यात आली.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे उस्मानाबाद - २८, तुळजापूर - १४, उमरगा - २८, कळंब - १, लोहारा - १३, भूम - ० व वाशी - ६ अशी आहे.
आज दिवसभरात ३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत दोन हजार ८०८ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालयात १९३७ रुग्ण उपचार घेत असून १२८ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
Top