उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शहरातील मुस्लिम बांधवांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या सात मोहल्ला क्लनिकमधून साडेचार हजारपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले आहेत. यासाठी नगरपालिकेकडून रोज ४५ ते ५० हजार रुपयांच्या औषधांचा पुरवठा केला जात आहे. तसेच सुरुवातीला एक लाखांचे उपकरणेही उपलब्ध केली आहेत. मोहल्ला क्लिनिकमुळे उपचार होत असल्यामुळे ख्वॉजानगर परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येवर अंकुश आला आहे. यामुळे ही संकल्पना आदर्शवत ठरत आहे. उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना चांगला फायदा होत आहे. यामुळे पालिकेच्या वतीने औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळातही मुबलकप्रमाणात औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली.
शहरातील जिल्हा रुग्णालयात व सरकारी आरोग्य यंत्रणा काेरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी व्यस्त आहे. तसेच खासगी रुग्णालयातील बहुतांश डाॅक्टर व कर्मचारी क्वारंटाइन झाले आहेत. काही डॉक्टर सामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठीही नकार देत आहेत. यामुळे शहरातील रुग्णांची मोठी हेळसांड सुरू होती. शहरातील ख्वॉजानगर परिसरातही कोरोनाचे रुग्ण आढळत होते. जनजागृतीचा अभाव तसेच साधारण रुग्णांवर वेेळेवर उपचार करण्याची यंत्रणा नसल्यामुळे अशा रुग्णांना कोरोनाची बाधा लवकर होते. यामुळे ख्वॉजानगर परिसरात मोठ्याप्रमाणात रुग्णांची वाढत होती.
रुग्णांच्या अडचणीवर मात करण्यासाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यासाठी संकल्पना तयार करण्यात आली. यानुसार ख्वॉजानगर परिसरात चार तसेच गालिबनगर, मिल्ली कॉलणी व शिरिण कॉलणी भागात प्रत्येकी एक असे एकूण सात मोहल्ला क्लिनिक टप्प्याने सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांनीही यासंकल्पनेला पाठबळ दिले आहे. आतापर्यंत या सात क्लिनिकमध्ये सुमारे साडेचार हजारांपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. सामन्य ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशा अाजारांसोबत उच्च रक्तदाब, रक्तशर्करा वाढणे किंवा कमी होणे आदी आजारावर उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे अधिक त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांची कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. मोहल्ला क्लिनिकसाठी नगरपालिकेच्या वतीने औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रत्येक क्लिनिकसाठी रोज सहा ते सात हजार रुपयांची औषधे देण्यात येत आहेत. म्हणजे रोज या उपक्रमासाठी पालिकेकडून ४५ ते ५० हजारांची औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे या संकल्पनेला मोठे बळ मिळाले आहे.