उस्मानाबाद / प्रतिनिधी-         
महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंच च्या वतीने शिक्षकांना कोरोना कक्षातून कार्यमुक्त करण्याची मागणी मा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.       
 निवेदनात म्हटले आहे की शासनाने 15 जून पासून शैक्षणिक सत्र चालू केले आहे  सर्व शिक्षक ऑनलाइन अभ्यास घेत आहेत  शिक्षकांना इंटरनेट,आणि सोशल मीडिया च्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थी सतत संपर्क राहणे आवश्यक आहे शिक्षकांना अभ्यासक्रम अध्यापनाचे व्हिडीओ बनवणे,शालेय अभिलेखे ठेवणे यासाठी पूर्ण वेळ मिळणे आवश्यक आहे. परंतु शिक्षकांना कोरोना कक्षामध्ये नेमणूक दिल्यामुळे विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे  शासनाने 17 ऑगस्ट 2020 च्या परिपत्रकानुसार शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोना कक्षातून कार्यमुक्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
 निवेदनावर राज्यकोषाध्यक्ष श्री पवन सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष श्री विश्वास (आप्पा) शिंदे  जिल्हा सरचिटणीस श्री दिपक हजारे यांच्या सह्या आहेत

 
Top