उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोरोनामुळे मागील ५ महिन्यापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बंद असलेली विविध मंदिरे, प्राथानास्थळे उघडावित या प्रमुख मागणीसाठी आज उस्मानाबाद येथे विविध धार्मिक संघटनांनी केलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने पाठींबा दिला. या निमित्ताने उस्मानाबादचे ग्रामदैवत धारासुर मर्दिनी देवीचे मंदिर, शहरातील कसबा भागातील श्रीराम मंदिर, जैन धर्मियांचे मंदिर, ज्ञानेश्र्वर मंदिर, विठठल मंदिर, येमाई मंदिर, उंबरे कोठा, तसेच ख्रिश्चन धर्मियांचे जॉन मलेलु ममोरियल चर्च उघडण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
जैन धर्मियांचे पवित्र पर्युषण पर्व सुरू असूनही त्यांना जैन मंदिर बंद असल्यामुळे पुजापाठ करता येत नाहीत. त्यामुळे हे मंदिर उघडावे अशी मागणी जैन धर्मीयांच्यावतीने यावेळी करण्यात आली. तर ख्रिश्चन धर्मियांचा चर्च बंद असल्यामुळे ख्रिश्चन धर्मियांना प्रार्थना आणि इतर धार्मिक कार्यक्रम करता येत नाहीत. त्यामुळे चर्च पुन्हा सुरू करावे अशी मागणी ख्रिश्चन धर्मियांच्या वतीने करण्यात आली.
श्रीराम मंदिर, ज्ञानेश्र्वर मंदिर, विठठल मंदिर, येमाई मंदिर आणि धारासुर मर्दिनी देवीचे मंदिर ही बंद असल्यामुळे हिंदू धर्मियांना ही पुजापाठ नित्योपचार करता येत नाही. हे तात्काळ उघडावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असून त्याला भारतीय जनता पार्टीचा पाठींबा आहे. उस्मानाबाद जिल्हयात तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरासमोर भाजपाचे आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच परंडा येथील कुलदैवत कालभैरवनाथ श्रीक्षेत्र सोनारी येथे आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तेर येथील संत गोरोबा काका, येरमाळा येथील येडेश्वरी मंदिरासह जिल्हयातील ७५ ठिकाणी घंटानाद आंदोलन करून उध्दव सरकारला मंदिरे आणि प्रार्थना स्थळे उघडण्यासाठी सद्बुध्दी देण्याचे साकडे घालण्यात येत असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे यांनी आंदोलना दरम्यान सांगितले.
याप्रसंगी जिल्हयाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाउ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य खंडेराव चौरे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाउ बागल, नितीन भोसले, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, जेष्ठ नेते प्रल्हाद धत्तुरे, चंद्रकांत काकडे, न.प.गटनेते युवराज नळे, इंद्रजित देवकते, प्रविण पाठक, राजसिंहा राजेनिंबाळकर, नाना घाडगे, देवा नायकल, राहुल काकडे, संदिप कोकाटे, पुजा देडे, गणेष मोरे, श्रीराम मुंबरे, अमोल राजेनिंबाळकर, पंकज जाधव, विनायक कुलकर्णी, लक्ष्मण माने, देवदत्त गोरे, जीवन वाठवडे, चेतन चाकवते, अक्षय भालेराव, सुरेश फडकुले, अतुल कांबळे, गणेष इंगळगे, अजय सपकाळ, संतोश क्षिरसागर, दादूस पाटील, अजय यादव, राजु जनवाडकर, शिरिष श्रीसुंदर, अमित म्हंकाळे, सोनु जनवाडकर, महादेव जाधव, अॅड.विद्युलता दलभंजन, किसन दलभंजन, अनिल दलभंजन, राजन दलभंजन यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.