उस्मानाबाद/प्रतिनिधी
कोरोना योध्दे असलेले देशभरातील अनेक पोलिस कोविड- १९ संसर्गाचे बळी ठरत आहेत. उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलातील अधिकारी - कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय कोविड- १९ संसर्गाने बाधित आढळल्यास त्यांच्या उपचाराकरीता तसेच क्वारंटाईन कक्षाकरीता तुळजापूर येथील साप्ताहीक बाजार परिसरात असणाऱ्या मंदीर संस्थानच्या भक्त निवास ईमारतीत तिसरा मजला पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या प्रयत्नातून राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्याकरीता वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
या ठिकाणी उपचार घेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांपैकी १० पोलिस कर्मचारी नुकतेच औषधोपचाराने कोरोनामुक्त झाल्याने त्यांना गुरूवारी घरी पाठविण्यात आले. यावेळी पोलिस दलातर्फे गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कोविड- १९ बाधीत आणखी ७ पोलिस कर्मचाऱ्यांवर या ठिकाणी औषधोपचार सुरु असून ५ पोलिस कर्मचारी हे क्वारंटाईन कक्षात आहेत.

 
Top