तुळजापूर / प्रतिनिधी-
  येथील घाटशिळ घाटातील एस आकाराचा वळणामधील सुरक्षा भिंतीच्या  लगत असलेल्या  वाढलेल्या वृक्षाच्या अतिरिक्त फांद्या काटेरी झाडे झुडपे काढण्यात आल्याने चालकांना आता घाटातुन ये जा करणरी वाहने  नजरेत येणार असल्याने सातत्याने होणाऱ्या अपघात आता टळणार आहेत.
 तिर्थक्षेञ तुळजापुर शहरातील घाटातली एस आकाराचा  वळणात नेहमीच होत असलेले अपघात ही चिंतेची बाब बनली आहे, या घाटात आजवर अनेकांना आपला जिव गमवावा लागला, हे नेहमी होणारे अपघात अतिशय तीव्र असलेल्या वळण रस्ता मुळे होतात शिवाय या ठिकाणी वळणातच सुरक्षा भिंतीच्या बाजुने अतिरिक्त वाढलेल्या झाडांच्या फांद्या, काटेरी झुडपे या मुळे वरुन खाली जाणारेला आणि खालून वरती येणाऱ्यांना वाहन दिसत नसल्यानेही येथे अनेक  अपघात होवुन जीवीत व वित्त हानी  झाली होती.
 या प्रकरणी  आनंद कंदले यांनी   दि. 28 जुलेै रोजी वनाधिकारी  राहूल शिंदे  यांना या ठिकाणी बोलावुन सदर परिस्थिती समजावून सांगितली असता त्यांनी  तात्काळ येथील झाडी झुडपे काढुन पूर्ण वळण पारदर्शक दिसेल असा घाट रस्ता करुन दिला

 
Top