तेर / प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा मध्यम प्रकल्पांतील पाणी साठ्यातून तेरसह ढोकी येडशी तडवळा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधीकरन विभागाच्या वतीने आँक्टोबर 2019 पासून पाणीपुरवठा करण्यात येत असून या गावांकडे जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठ्याची लाखो रुपयांची थकबाकी येणे आहे त्यामुळे ग्रामपंचायतीकडे असलेल्या थकबाकीच्या 25 टक्के थकबाकी 31 जुलै पर्यंत भरा अन्यथा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र जिवन  प्राधीकरणाचे कार्यकारी  अभियंता राजकुमार पांडव यांनी ग्रामपंचायतीना पत्राद्वारे दिला आहे
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत तेरणा मध्यम प्रकल्पांतील पाणी साठ्यातून चार गाव पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात आली या योजनेतंर्गत तेरसह तडवळा ढोकी या गावांना आँक्टोबर 2019 पासून पाणीपुरवठा  चालू करण्यात आला तेव्हा तेर ढोकी तडवळा याचं गावांनी जीवन प्राधीकरणाचे पाणी घेतले होते तेरसह ढोकी तडवळा या तीन ग्रामपंचायतीकडे आँक्टोबर 2019 ते मे  2020 पर्यंत 48 लाख 62 हजार 780 रूपये थकबाकी आहे तर ग्रामपंचायतींची नळधारकाकडे ही मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे तेरसह ढोकी तडवळा या ग्रामपंचायतींनी 31जुलै पर्यंत किमान 25 टक्के तरी पाणीपुरवठ्याची थकबाकीचा भरणा करावा अन्यथा जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा खंडीत करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता राजकुमार पांडव यांनी तेर ढोकी तडवळा या ग्रामपंचायतीना पत्राद्वारे  दिला आहे
ग्रामपंचायती कडील बाकी 
ढोकी       :- 21लाख 60 हजार 368 रुपये
तेर         :-  18 लाख 73 हजार 12 रुपये
तडवळा  :-  8 लाख 29 हजार 400 रुपये
 एकूण   :- 48 लाख 62 हजार 780 रुपये
 
Top