तुलजापूर /प्रतिनिधी- 
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची वाढ होत असतानाच कोरोना बाधीतांनवर उपचार करणाऱ्या आरोग्य खात्यातील कर्मचारी ही   कोरोना बाधीत होत असल्याने मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .तुळजापूर तालुक्यातील अनेक गावे व शहरामधुन दररोज कोरोना रुण दररोज आढळत आहेत .
सध्या येथील उपजिल्हारुग्णालयातील कोरोना उपचार रुग्णालयात सहा -कोरोना बाधीत उपचार घेत आहेत तर तुळजापूर येथील घाटशिळ रोडवर असलेल्या श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचा भक्त निवासातील क्वारटांईन सेंन्टर मध्ये 150 लोक क्वारटांईन केलेले आहेत.आजपर्यत नऊ कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेवुन बरे झाले आहे.
सोमवारी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पाँजिटीव्ह आला आहे यांच्या संपर्कातील १३ लोकांना क्वारटांईन केले असुन ६ लोकांचे स्वँब घेतले आहेत. या पुर्वी कोरोना बाधीत रुग्ण विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचारीस  कोरोनाची बाधी झाली तिच्या संपर्कातील कर्मचारी, डाँक्टर मंडळी  सुमारे २० जणांना क्वारटांईन व्हावे लागले होते. यातील काही मंडळीचे स्वँब घेवुन ते तपासणीस पाठवले असता सगळ्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता.  नंतर तब्बल आठवड्याने एका आरोग्य कर्मचाऱ्याचा अहवाल पाँजिटीव्ह  आल्याने सध्या नागरिकांन बरोबरच आरोग्य विभागातील मंडळीची कोरोना साखळी तोंडणे गरजेचे बनले आहे.
आधीच अपुरे डा़ँक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवावर  कोरोनाशी दोन हात करीत असलेल्या आरोग्य विभागावरच कोरोना संकट घोंघावले असल्याने आता तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने स्वताला व आपल्या जवळच्या मंडळीना  कोरोनाची बाधा होवु नये यासाठी कोरोना रक्षक बनणे गरजेचे झाले आहे,
 
Top