रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आली आंदोलनाची चेतावणी 
कळंब/शिवप्रसाद बियाणी 
 जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातून पदोन्नतीने कनिष्ठ अभियंता पदी नेमणूक करून भरती प्रक्रियेत अनियमितता करून भ्रष्टाचार करणार्‍या अधिकारी यांची चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र अंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला.
कळंब उपविभागीय कार्यालयाला रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले पुढे आपल्या निवेदनात असे नमुद केले कि, जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे सन 2017 ते 30 जून 2020 या कालावधीत जिप बांधकाम विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच लघूपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातून 28 पदे भरण्यात आले असून जिप बांधकाम विभागात या पूर्वीच कनिष्ठ अभियंत्याची मंजूर पदापेक्षा जास्तीची पदे भरण्यात आली. तेथील कनिष्ठ अभियंता यांची पदे अतिरिक्त आहेत परंतु लघूपाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग या ठिकाणी मुळ जिप अस्थापणेवरिल (मजीप्राचे प्रतिनियुक्ती वरील वगळून)19 पदे रिक्त आहेत. जिप उस्मानाबाद प्रशासनाने कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देताना 50% पदोन्नतीने व 50% सरळ सेवा भरतीने कनिष्ठ अभियंत्याची  पदे भरणे आनिवार्य असून सदर पदोन्नतीने कनिष्ठ अभियंता यांची पदे शंभर बिंदू नामावली चा अवलंब करून भरती करणे गरजेचे असताना भरती प्रक्रिया चुकीचे पद्धतीने केली आहे तसेच लघूपाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागा मध्ये कनिष्ठ अभियंत्याची पदे रिक्त असताना व जिप बांधकाम विभाग उस्मानाबाद या मध्ये कनिष्ठ अभियंता पदे रिक्त नसून अतिरिक्त असताना  जिप उस्मानाबाद प्रशासनाने शंभर बिंदू नियमावली चा अवलंब न करता बांधकाम विभाग लघूपाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सर्व रिक्त पदे एकत्र बेरीज करून रिक्त पदाचा ताळमेळ लावून जिपबांधकाम विभागामध्ये रिक्त पदे नसताना चुकीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. लघूपाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग मधील कनिष्ठ अभियंत्यांची रिक्त पदे जि प बांधकाम विभागात दर्शवून फार मोठी अर्थिक देवानघेवान करून शंभर बिंदू नियमावली व 50% पदे सरळ सेवेने व 50% पदे पदोन्नतीने न भरता 100% पदे हि पदोन्नतीने भरुन फार मोठ्या प्रमाणात अनियमितता करून भ्रष्टाचार जिल्हा परिषद उस्मानाबाद प्रशासनाने केलेला आहे. तेव्हा माननीय साहेबांना विनंती आहे की जिल्हा परिषद उस्मानाबाद येथील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातील पदे पदोन्नतीने कनिष्ठ अभियंता पदी चुकीच्या पद्धतीने नेमणूक करण्यात आली त्याची सखोल चौकशी  करावी पदोन्नतील अनियमितता व भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा न्यायालयात जाण्याची परवानगी देण्यात यावी अन्यथा कनिष्ठ अभियंता पदोन्नतीने भरती प्रक्रिया विरोधात  रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा परिषद उस्मानाबाद समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल
असा इशाराही निवेदनाद्वारे करण्यात आला. निवेदनावर अनिल हजारे रिपब्लिकन सेना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष, विठ्ठल मामा समुद्रे, लाखन गायकवाड रिपब्लिकन सेना तालुका अॅड वाघमारे ई बी, व ईतर कार्यकर्तेच्या स्वाक्षऱ्या आहेत
 
Top