वाशी  /प्रतिनिधी-
वाशी तालुक्यातील पारगाव सर्कलमधील जानकापुर या गावातील शेतकरी पिक विमा भरणे पासून वंचित राहत आहेत.यापूर्वीही हरभरा ज्वारी गहू आदी पिकाचा विमा या गावातील शेतकऱ्याला भरता आला नाही.मागील वर्षी या गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊनही त्यांना त्याचा कसलाही मोबदला भेटलेला नाही. याहीवर्षी पिक विमा कंपनीकडून याच गावचा पिक विमा भरून घेतला जात नाही. पिक विमा भरताना ऑनलाइन पोर्टल वर जनकापुर या गावातील खाते नंबर किंवा सर्वे नंबर टाकला तर जवळका येथील शेतकऱ्याचे नाव दिसत आहे. त्यामुळे जानकापूर येथील शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहत आहेत.
त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन दोन दिवसाच्या आत जानकापूर येथील शेतकऱ्यांचा पिक विमा भरण्याची सोय करावी अन्यथा दिनांक 16/07/2020 रोजी तालुका कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल. व याची सर्वस्वी जबाबदारी विमा भरून घेणारी कंपनी तसेच कंपनीचे कर्मचारी व कृषी विभागाचे अधिकारी व प्रशासनाचे अधिकारी राहतील अशा प्रकारचे लेखी निवेदन तालुका कृषी अधिकारी श्री कोयले यांना शिवसेना वाशी उप तालुका प्रमुख विकास तळेकर यांनी दिली आहे.

 
Top