उस्मानाबाद /प्रतिनिधी-
शहरातील किराणा दुकान संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळा आदेश काढला आहे. शहरातील सर्व किराणा दुकानेरोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती.शहरात कोरोणाचा संसर्ग वाढत आहे. रोज पाच ते सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. गेल्या आठवड्यात नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील सर्वच नगरसेवकांनी लॉकडाउन करण्यासंदर्भात आग्रही भूमिका मांडली होती. पालिकेच्या सभेत ठराव झाल्यानंतर त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणारे पत्र देण्यात आले होते.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात सोमवारपासून (दि. १३) संचारबंदी लागू केली. यामध्ये औषधी दुकान भाजीपाला, किराणा, दूध आदी जीवनावश्यक सेवा देणाऱ्या अस्थापना सुरू आहेत.दरम्यान, शहरातील किराणा दुकान संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळा आदेश काढला आहे. शहरातील सर्व किराणा दुकानेरोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. आता यामध्ये बदल करीत दुपारी दोनपर्यंत सर्व किराणा दुकाने सुरू राहणार आहेत. दरम्यान, सोमवारी आदेश काढले असून तत्काळ अंमलबजावणी सुरू झाल्याने अनेक किराणा दुकानदारांना याची कल्पना नव्हती. आदेश त्यांच्यापर्यंत पोचण्याचा वेळ लागणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व किराणा दुकानदारांनी या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले.