परंडा / प्रतिनिधी :-
गोपनीय अहवालाची एक झेराॅक्स प्रत पूनर्विलोकन अधिकारी यांचे सहीसह सर्व शिक्षक कर्मचा-यांना प्रतिवर्षी द्यावी याबाबतचे निवेदन प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना देण्यात आले.
शिक्षकांचे १२ वर्षे व २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजूरीसाठी मागील दोन-तीन वर्षाचे गोपनिय अहवाल लागतात.त्याशिवाय संबंधितास वरिष्ठ निवड श्रेणीचा लाभ मिळूच शकत नाही.त्यामुळे गोपनीय अहवालाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोपनिय अहवाल व्यवस्थित व सुरक्षित ठेवणे ही शिक्षण विभागाची जबाबदारी आहे.
प्रसंगी ब-याच शिक्षकांचे गोपनीय अहवाल शिक्षण विभागात सापडत नसल्याने चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे प्रस्तावात त्रुटी निघत असल्याने संबंधित शिक्षक या लाभापासून वंचित राहतात.पर्यायाने नवीन गोपनीय अहवाल मिळविण्यासाठी त्या-त्या कालावधीतील अधिका-यांकडे शिक्षकांना खेटे घालावे लागतात.काही अधिकारी सहकार्य भावनेतून कोणाचे नुकसान होऊ नये म्हणून नवीन गोपनीय अहवालावर स्वाक्षरी करतात तर काही अधिकारी सही करत नाहीत.त्यामुळे शिक्षकांना मानसिक व आर्थिक त्रासाला बळी पडावे लागते.अशा प्रसंगातून सर्व शिक्षक कर्मचा-यांची सुटका होण्यासाठी पुनर्विलोकन अधिकारी यांचे सहीसह गोपनीय अहवालाची एक झेराॅक्स प्रत देणे गरजेचे आहे. गोपनीय अहवालाची झेराॅक्स प्रत मिळाली म्हणून कर्मचा-यांची दिनांकित सही घेतली जाते पण आजवर कोणालाही प्रत मिळालेली नाही.अशा आशयाचे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत,जिल्हा नेते संतुक कडमपल्ले,तालुका उपाध्यक्ष शहाजी झगडे आदी उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी मॅडम यांनी गोपनीय अहवाल टेबलच्या कुंभार मॅडम यांना तातडीने बोलावून घेऊन सर्व गटशिक्षणाधिकारी यांना तसे पत्रक तयार करा व लागलीच माझी सही घेऊन आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले असल्याचे प्रहारचे शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी माहिती दिली आहे.