लोहारा/ प्रतिनिधी
लहुजी शक्ती सेना लोहारा तालुका अध्यक्ष दीपक प्रकाश रोडगे यांनी कोरोना च्या संकटात आपल्या जिवाची परवा न करता सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावुन आपले कर्तव्य यशस्वी रीत्या पार पाडली आहे. या कार्याची दखल घेत सम्राट ग्रुप लोहारा उस्मानाबाद यांच्या वतीने कोरोना योद्धा या पुरस्काराने यांना गौरवण्यात आले. हे सन्मान पत्र सम्राट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष उत्तम रंगराव भालेराव यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सम्राट ग्रुपचे कार्याध्यक्ष कृपाल भैय्या माटे, उपाध्यक्ष नंदन  थोरात, लहुजी शक्ती सेना लोहारा तालुका युवा अध्यक्ष विकी मोरे, इत्यादी उपस्थित होते.

 
Top