उमरगा/प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातील कवठा येथे नियमांचे उल्लंघन करीत पन्नास पेक्षा अधिक लोकांना जमवून मंगळवारी (दि. १४) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास मुलीचा लग्न सोहळा उरकल्याबद्दल मुलीच्या आई- वडिलांसह मंगल कार्यालयाच्या संचालकाविरोधात रविवारी (दि. १९) रोजी उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील कवठा येथील गुलाब नरसिंग भोसले, पत्नी यशोदा भोसले यांची मुलगी सुप्रिया हिचे लग्न निलंगा तालुक्यातील योगेश कल्याणराव इंगळे-पाटील (रा. हलसी हत्तरगा) यांच्याशी मंगळवारी (दि.१४) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास गावातील मंगल कार्यालयात पन्नास पेक्षा अधिक लोकांना जमवून विना परवाना लग्न लावून दिले. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार अटी व शर्तीचे उल्लंघन करत मुलीचा विवाह सोहळा केला. मंगल कार्यालय संचालक चनबास तेलंग यांनी कोरोना विषाणू संसर्गमुळे रोगाचा फैलाव होण्याची शक्यता असतानाही स्वतःच्या मंगल कार्यालयात लग्न करण्यास परवानगी दिली. यामुळे आदेशाचे उल्लंघन झाले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या आदेशानुसार पोकॉ गोपाळ मालचमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलीचे आई वडील व मंगल कार्यालय संचालक (तिघेही रा. कवठा) यांच्या विरोधात रविवारी उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पोलिस नाईक दत्ता शिंदे हे करीत आहेत. पुणे येथून लग्न सोहळ्यासाठी आलेल्या मुलीच्या चुलत्याला प्रकृती अवस्थ वाटू लागल्याने लातूर येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी चुलत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ कवठा गाव सील केले आहे. तसेच आज सोमवारी लातूर येथे चुलतीचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आहे.