काटी / प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्र्वभूमीवर उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास (घाडगे) पाटील यांनी शनिवार दि.25 रोजी सायंकाळी 5:30 वाजता काटी गावास भेट दिली.
काटी येथे कोरोनाचे एकूण 14 रुग्ण आढळल्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, स्थानिक प्रशासनामार्फत याठिकाणी करण्यात आलेल्या वैद्यकीय उपाययोजनांची तसेच इतर  बाबींचा आढावा घेतला.यावेळी उपसरपंच सुजित हंगरगेकर आणि ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे यांनी मागील चार महिन्यांपासून कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली होती. त्यास ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद दिला असून बाहेरून आलेल्यांपासून कोरोनाचा शिरकाव झाल्याचे सांगून
कोरोना रुग्णांची चेन ब्रेक करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने 16  ते 22 जुलै ला  अर्सेनिक अल्बम 30  गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

 
Top