उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रामार्फत कृषि निविष्ठा जसे बियाणे, खते, किटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी लिंकींग करुन विक्री करणे, एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत आकारणे, उपलब्ध साठा असताना विक्री न करणे, खरेदी पावती न देणे, निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांची विक्री करणे व मुदतबाह्य निविष्ठांची विक्री करणे, सोयाबीन बियाणे उगवण इत्यादी बाबत तक्रारी किंवा शंका असल्यास कृषि विभागाच्या व्हॉटसॲप क्रमांक 02472223794 वर पाठवाव्यात. तक्रार नोंदवितांना आपले व कृषि सेवा केंद्राचे नाव, गाव व तालुक्याचा उल्लेख करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी  व पशुसंवर्धन सभापती दत्ता (आण्णा) ज्ञानोबा साळुंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, कृषि विकास अधिकारी डॉ.टी.जी.चिमनशेटे यांनी केले आहे.
 
Top