उस्मानाबाद /प्रतिनिधी-
१९९३ नंतरच्या भूकंपानंतर मराठवाड्यात भूकंप कसा असतो याची माहिती सर्वश्रुत झाली आहे या २७ वर्षाच्या काळात मराठवाड्यात भूकंपाचे अनेक धक्के जाणवलेत जमिनीतून आवाज येणे आणि भूभागाला धक्के जाणवणे म्हणजे भूकंप हे उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील परिसरातील लोकांना माहीत झाले आहे परंतु ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपाने मांडलेला विध्वंस उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सी येथील गावकऱ्यामध्ये देखील पाहिला त्यांना नेमके काय झाले आणि काय घडले हे कळालेच नाही जमीन हादरली क्षणार्धात घरे कोसळली,काहींच्या घरांना भेगा गेल्या तर काहींच्या घरांच्या भिंती पडल्याने संसार उघड्यावर आला यामुळे गावकऱ्यामध्ये भीती निर्माण झाल्याने मूळ गावातील आहे ते राहते घरे सोडून लोक इतर ठिकाणी विस्थापित होऊ लागली.
यामध्ये काहींनी आपल्या शेतामध्ये तर काहींनी आपल्या गावातील इतर जागेमधील आपले नवीन घर स्तलांतरित करून सावरण्याचा प्रयत्न करू लागले यापैकीच गावातील मातंग समाजातील २५ ते ३० कुटुंबानी गावातील राष्ट्रीय महामार्ग शेजारी असणाऱ्या गावठाण जमीनीवर अतिक्रमण करून आपली घरे थाटली भूकंपानंतर बाधितांना पुनर्वसनासाठी जागेची उपलब्धता नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाकडून सन १९९४ मध्ये गावठाण विस्तार वाढ योजनेच्या माध्यमातून भूसंपादनासाठी गावातील गट क्रमांक ३८१ चा प्रस्ताव तहसील कार्यालय व जिल्हाधीकारी कार्यालय यांच्याकडे पाठवण्यात आला व तो सन १९९७ मध्ये तो प्रस्ताव निर्गमित करून शेतीची खरेदी विक्री बाजारी मूल्यावर आधारित किंमत निश्चित करून मूल्यांकन करून भूसंपादन कायदा कलम १९८४ प्रमाणे निवाडा जाहीर करून संबधीत शेतकऱ्यास मावेजा देण्यास आला व जमीन ग्रामपंचायतच्या नावे मालकी हक्काने नोंद करण्यात आली.
परतू काही तक्रारीमुळे सदर जमीन आजतागात ग्रामपंचायतच्या ताब्यात मोजून व हद्द कायम करून दिली नसल्यामुळे बाधित कुटुंबाचे पुनर्वसन करता येत नव्हते यामुळे ही योजना शासनाच्या फक्त कागदोपत्रीच राहिली या २७ वर्षाच्या काळामध्ये वेळोवेळी बाधित कुटुंबांनी ग्रामपंचायकडे सध्या राहत असलेल्या जागेची मालकी किंवा भोगवाट्यामध्ये नोंद घ्यावी याकरता मागणी देखील केली परंतु बदलत्या काळाच्या ओघामध्ये गावपुढाऱ्यानी केलेल्या दुर्लक्षणांमुळे या बाधित कुटुंबाच्या व्यथा व अडचणी बघून बगुन पाझर फूटलाच नाही भूभागाला बसणारे धक्के मात्र बसत राहिले पण यांना बसत असलेले परिस्थितीचे अक्षम्य धक्के मात्र त्यावेळच्या गाव पुढाऱ्यानी मात्र दुर्लक्षित करून सोडून दिले.
काही पुढाऱ्यांनी यांच्या गरजेचा दुरुपयोग करुन अर्थिक फायदा देखील वेळोवेळी घेतला आहे तर काहीनी आपले जागेचे काम मंत्रालय स्तरावरून करुन देतो म्हणून असंख्य फेऱ्या सुद्धा मुंबई वारीच्या करायला लावल्या आणि आर्थिक पिळवणूक सुद्धा केली आहे.
आज याठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीची कुटुंबे वाढली पण जमीन मालकीची नसल्याने घर वाढवता येत नव्हते आत्तापर्यंत अनेक शासकीय योजनेपासून वंचित राहिलेल्या या तरुणाना कोणी मुलगी देता नाही कारण वास्तव्यास असलेली घरे अपुऱ्या जागेत असल्यामुळे व घरकुल योजनेचा लाभ घेण्याकरिता गावात त्यांच्या नावे आवश्यक तेवढी जागाही उपलब्ध नसल्यामुळे अडचणींमधून मार्ग निघत नसल्यामुळे अनेकांनी आहे त्या जागेवर पत्र्याचे शेड उभा करून घराचा विस्तार वाढवायला सुरुवात केली परंतु पक्के घरे नसल्याने व आहे त्या ठिकाणी भौतिक सुवीधा उपलब्ध नसल्याने मुलीच्या आई वडिलांची मुलगी देण्यास मानसिकता होत नव्हती अशा दरम्यानच्या काळात मुले मोठे झाले त्यांची लग्ने झाली आणि जागा अपुरी पडू लागली यामुळे अनेकांना घराची समस्याच उदभवू लागली परंतु वडगावचे युवानेते अंकुश मोरे,पंचायत समिती सदस्य गजेंद्र राजेंद्र जाधव,सरपंच अंकिता मोरे हा विषय प्राधान्याने घेत सन २०१५ पासून या जागेच्या विषयाचा सतत शासन दरबारी जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय येथे पाठपुरावा करत शासनाच्या व खासदार ओमदादा राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले की या सर्व भूकंपातील बाधित विस्थापित लोकांचे आजतागात पुनर्वसन गावठाण विस्तारवाढ असलेल्या जागेत न झाल्याने यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही यामध्ये प्रामुख्याने मागासवर्गीय असल्याने घरकुल योजना,नळ पाणीपुरवठा योजना,रस्ते योजना,लाईट व वैयक्तिक जागेच्या मालमत्तेच्या नोंदी नसल्याने अतिक्रमण धारक म्हणून असल्याने जागेच्या ८ या ला नोंद नसल्याने बऱ्याच अडचणी उद्भवत असल्याचे पंचायत समिती सदस्य गजेंद्र राजेंद्र जाधव निदर्शनास आणून दिले या प्रकररणाचे गांभीर्य ओळखून खासदार ओमदादा राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख व भूमापण अधिकारी उस्मानाबाद निलेश उंडे यांना दिलेल्या पत्रान्वये व सूचनेनुसार आज दिनांक ११ जून रोजी हद्द कायम मोजनेची तात्काळ नोटीस काढून मोजणी कर्मचारी एस एस कोरे यांच्या माध्यमातून सदर गट क्रमांक ३८१ मढील जागेत ग्रामपंचायत कार्यालय वडगाव सी यांच्या मालकीच्या नावे असलेली गावठाण विस्तार वाढ योजनेची सदर ५ एकर जमीनीची पाहणी करुन केले व हद्द व हददीच्या खुणा दिनांक १८ जुन रोजी कायम करून मोजुन देवुन त्याठिकाणी खांब रोवून ताब्यात देण्यात येणार आहेत.यामुळे ग्रामपंचायतला याठिकाणी जागेची रचना मांडणी करून बाधित विस्थापित कुटुंबाना लवकरात लवकर प्लॉट देयला मदत झाली आहे.
सदर मोजणीमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला जागेचा प्रश्न मिटत असल्याने गावकऱ्यामधून व बाधित कुटुंबामधून समाधान व्यक्त होत आहे.