नळदुर्ग /प्रतिनिधी-
कोरोना विषाणूने बाधीत झालेल्या रुग्णांसाठी शिवशाही तरुण मंडळ, सकल मराठा परिवार, रॉयल ग्रुप व औषध प्रशासन मेडीकल असोशियटच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे शिवराज्यभिषेका दिनानिमीत्त अयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात तरुणांनी चांगला प्रतिसाद देत तब्बल ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहकार्य केले.
शिवराज्यभिषेक दिनानिमीत्त नळदुर्ग येथिल शिवशाही तरुण मंडळ, सकळ मराठा परिवार, रॉयल ग्रुप व औषध प्रशासनाचे मेडीकल असोशियटच्या वतीने दि. ६ जून रोजी मराठा गल्लीतील सभागृहामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या रक्तदानासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रक्तपेढी आली होती. दरम्यान या रक्तपेढीसाठी तरुणांनी रक्तदान करुन चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रारंभी औषध प्रशासनाचे उस्मानाबाद जिल्हा निरीक्षक विलास दुसाने, नगरसेवक उदय जगदाळे, नितीन कासार, बसवराज धरणे, महालिंग स्वामी, विनायक अहंकारी, माजी नगरसवेक सुधीर हजारे, शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष पूदाले, शिक्षक सेलेचे जिल्हा अध्यक्ष संजय दळवी आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि त्या नंतर प्रत्यक्षात रक्तदान शिबीरास सुरुवात करण्यात आली, दरम्यान या शिबीरामध्ये सुमारे ५१ तरुणांनी आपले रक्तदान करुन शिवशाही तरुण मंडळ, सकळ मराठा परिवार, रॉयल ग्रुप व नळदुर्ग, अणदुर व जळकोट येथील मेडीकल असोसियट यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. सध्या कोरोना विषाणूचा मोठया प्रमाणात प्रसार होत आहे, आणि या रोगाने बाधीत झालेल्या रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे त्यामुळे शासनाने राज्यातील तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार नळदुर्ग शहरात शिवशाही तरुण मंडळ, सकळ मराठा परिवार, रॉयल ग्रुप यांनी मेडीकल असोसियट संघटनेला सोबतील घेवून रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबीरात सौ. पूजा उमेश जाधव, कु. श्वेता आंनद काटकर या दोन महीलांचे रक्तदान करण्यात आले.
दरम्यान या रक्तदान शिबीरास तुळजापूर तालुक्याचे नेते अशोक जगदाळे यांनी ही भेट देवून रक्तदान शिबीरास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच बरोबर या रक्तदान शिबीरात उमेश जाधव व त्यांच्या पत्नी सौ. पूजा जाधव यांनी रक्तदान केल्याबददल या पती पत्नींचा सत्कार मंडळाच्या वतीने अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शहाजी मुळे, दिपक काशिद, संतोष मुळे, युवराज जगताप, विशाल डुकरे, संतोष किल्लेदार, संकेत काशिद, पंकज हजारे, प्रमोद जाधव, ज्ञानेश्वर सावंत, अविनाश जाधव, प्रशांत पवार, सुरज किल्लेदार, बाळू सावंत, संदीप सावंत, श्रीकांत सावंत, महेंद्र काळे, अभिजीत किल्लेदार, योगेश माने, विशाल मोटे यांच्यासह शहरातील व अणदुर जळकोट येथील औषध दुकान मालकांनी परिश्रम घेतले.
 
Top