तुळजापूर / प्रतिनिधी
 तालुक्यात कोरोनाचे आणखीन काही रुग्ण सापडले आहेत, त्याअनुषंगाने संबंधित गावास भेटी देऊन नागरिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
तुळजापूर तालुक्यातील ईटकळ, तामलवाडी, मसला (खु), बोळेगाव, सलगरा (दि), माळूंब्रा या गावात नवीन कोरोना रुग्ण आढळल्याने या गावांस भेटी देऊन गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत सूचना दिल्या आहेत.
यावेळी नागरिकांनी महावितरणच्या अडचणी, बँकेतून लवकर कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. काही गावातील नागरिकांनी पोलीस बंदोबस्त वाढवण्याबाबत विनंती केल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्त वाढवण्याबाबतही सूचना दिल्या आहेत. भिवंडी येथील एका मृत व्यक्तीवर काटी येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यात प्रशासनाचा हरगर्जीपणा उघड झाला होता. या अनुषंगाने काटी येथे भेट घेवून नागरिकांशी संवाद साधला. आरोग्य यंत्रणेस घरोघरी जाऊन सर्व तपासणी करणे व लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या. पोलीस प्रशासनाने सतर्क राहून येथे येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मदत करावी याबाबत सूचना दिल्या.
तामळवाडी येथे आशा स्वयंसेविका यांची भेट झाली असता त्यांच्याशी चर्चा करून कोरोना संकट काळात गावागावात ते करत असलेल्या कामाचे कौतुक केले. जिल्हा परिषद मार्फत आशा स्वयंसेविका रु.2000 आणि गटप्रवर्तकांना रु.1000 अतिरिक्त मानधन भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री.रोडगे, तहसीलदार श्री.सौदागर तांदळे,  श्री.नेताजी पाटील, श्री.राजकुमार पाटील, श्री.बापू कणे, श्री.विक्रमसिंह देशमुख, आरोग्य अधिकारी डॉस्मिता.लोंढे आदींची उपस्थिती होती.
 
Top