उस्मानाबाद / प्रतिनिधी
  सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर उभारण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारक व अध्यासन समितीवर बेंबळी ता.उस्मानाबाद येथील पुण्यश्लोक फाउंडेशन चे अध्यक्ष धनंजय तानले यांची निवड करण्यात आली आहे.
यासामितीवर अध्यक्ष म्हणून विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, सचिव म्हणून विद्यापीठाचे प्रबंधक प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा,  तर सदस्य म्हणून इंदोर संस्थानचे राजे भूषणसिंह होळकर, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार गोपीचंद पडळकर,  राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने, पुण्यश्लोक फाउंडेशन चे अध्यक्ष धनंजय तानले, कुलसचिव डॉ. विकास घुटे, अधिष्ठाता डॉ. विकास कदम  वित्त व लेखा अधिकारी श्रेणिक शहा यांचा समावेश आहे.
या स्मारकाचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील सर्वात मोठा व पूर्णाकृती पुतळा ठरणार आहे तसेच त्याच्या बाजूने सुशोभिकरण होणार असून अम्फीथेटर हि बांधले जाणार आहे. तर अध्यासन केंद्रात अहिल्यादेवींचे व त्यावर संशोधन कार्य चालणार आहे.
धनंजय तानले हे गेल्या २०  वर्षापासून उस्मानाबाद भोसरी,पिंपरी चिंचवड सह राज्यात सामाजिक कार्यात सक्रीय असतात. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची या समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
 
Top