तुळजापूर/प्रतिनिधी- 
 श्री तुळजाभवानी  मंदीरा शेजारी असलेल्या एका २२ वर्षीय युवकाने  राहत्या घरात बुधवार दि.३ जुन रोजी राञी साडेअकरा च्या वाजण्याच्या सुमारास गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली.
आत्महत्या  कुण्या कारणामुळे केली हे स्पष्ट झाले नाही. सदरील तरुणाचे नाव आकाश अशोकराव पाटील आहे. त्याच्या पश्चात आई , वडील,  भाऊ,  बहीन असा परिवार आहे गुरुवारी सकाळी शुक्रवार पेठ भागातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आकाशच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबतीत तुळजापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
 
Top