तेर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील 22 वर्षीय व्यक्तीचा केारोना पाँझीटीव अहवाल आल्याने उस्मानाबाद जिल्हा सामान्य रूग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.तो रूग्न उपचारामुळे बरा झाल्याने आज रूग्न घरी आला आहे.नागरीकानी टाळया वाजवून, फुले उधळून रूग्नाचे स्वागत केले.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पुण्याहून आलेल्या 22 वर्षीय  व्यक्तीला ताप व घश्यात खरखर होत असल्याने 24 मे ला तेरच्या ग्रामीण रूग्नालयात तपासणीसाठी आला.  त्याला  तपासून स्वँब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता.याचा अहवाल 26 मे ला पाँझीटीव आल्याने तेरमध्ये घबराहट निर्माण झाली होती. तेरच्या ग्रामीण रूग्नालयातून कोरोना बाधीत व्यक्तीला उस्मानाबाद येथील जिल्हा सामान्य रूग्नालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते.तो रूग्न उपचारामुळे बरा झाला असून आज 4 जूनला घरी आला आहे. नागरीकानी टाळया वाजवून , फुले उधळून रूग्नाचे स्वागत केले.
 
Top