उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 बेंबळी विकास चर्चा या फेसबुक पेजवर सोमवार  दि. १५ जून च्या रात्री ठिक आठ वाजता बेंबळी पाेलिस ठाण्याचे कर्तव्यक्ष अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक  मुस्तफा शेख  लाईव्ह येऊन कोविंंड-19 या संदर्भात पोलीस विभागाची जबाबदारी, सामाजिक सुरक्षा आणि जनतेचे सहकार्य ,पुढील काळामध्ये निर्माण होणाऱ्या विविध समस्या व त्यावर उपाय योजना ,जनतेच्या मनामधील विविध प्रश्न  आदी संदर्भात मार्गदर्शन करून सर्वांशी मुक्त संवाद साधून  शंकेचे निरसन  करणार आहेत. यामध्ये बेंबळीतील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन अॅडमिन पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.
बेंबळी विकास चर्चा फेसबुक लाईव्हमध्ये यापुर्वी ॲड. उपेंद्र कटके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी व डॉ. राठोड सर, होमिओपॅथी तंज्ञ अमोल गावडे  यांनी  यशस्वीपूर्ण मार्गदर्शन केले आहे. त्यानंतर आता सोमवारी रात्री ठिक ८ वाजता बेंबळी पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सर्व गांवामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून अनेक बदलाव घडविणारे कर्तव्यदक्ष अधिकारी तथा सहाय्यक पुलिस निरीक्षक मुस्तफा शेख लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील तसेच जिल्हयातील नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
त्यामुळे बेंबळी विकास चर्चा या फेसबुक पेज वरून  गावातील तसेच जिल्हयातील नागरिकांनी लाईव्ह घेऊन आपल्या मनातील विविध शंकाचे निरसन करावे,  या कार्यक्रमात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top