तुळजापूर /प्रतिनीधी
 दुष्काळ अतिवृष्टी कोराना नंतर आता पाऊसाने दिलेली  उघडीप  या दृष्टचक्रात शेती व्यवसाय अडकला असुन पावसाने दिलेल्या उघडीप मुळे 21152 -हेक्टर क्षेत्रातील खरीपाची 24 टक्के पेरणी धोक्यात आली आहे.
तुळजापूर तालुक्यात खरीपाचे ऐकुणसरासरी  पेरणी 87565.72 क्षेञ असुन त्या पैकी आज पर्यत 21152 -हेक्टर क्षेञावर 2416टक्के पैरणी करण्यात आली आहे. उर्वरीत पेरणी पावसाने उघड दिल्याने थांबली आहे.यातही स सोयाबीन चे सरासरी क्षेत्र 382 14.99हेक्टर क्षेत्र असुन त्यापैकी 19124हेक्टर क्षेत्रात 54.4टक्के पेरणी आजपर्यत झाली आहे. झाली आहे. तुळजापूर तालुक्यात आज पर्यत 130मिमि पाऊस झाला आहे पण मागील आठवड्या पासुन तालुक्यात पावसानै ओढ दिल्यानै झालेली पैरणी येत्या चार ते पाच दिवसात पाऊस नाही पडला तर धोक्यात येणार आहे.
...... अन्यथा थांबावे
 पुरेशी ओल असेल तरच पेरणी करावी अन्यथा थांबावे तसेच सोयाबीन पेरणी  15 जुलै पर्यत केली तरी चालते त्यामुळे 100 मिमि पाऊस पडला तर व जमिनीत ओल असेल तरच करावी अन्यथा थांबावे असे आवाहन कृषी अधिकारी गायकवाड यांनी केले
आजपर्यत पेरणी झालेले क्षेत्र कंसात सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
भात (1257.69) 15 हेक्टर (1.19%) खरीप ज्वारी (2088.91)25(1.20%) बाजरी (2043.65) 30(1.47%) मका (9751.70)168(.1.72%),तुर (16524)650(3.93%) मुग (5669.95) 439 (7.60%) उडीद (7802.29)640(8.20%), भुईमुग (1829.62)12(.0.66%), तीळ (765.69) 2 (.26%), सुर्यफुल (476.39)8(1.68%), कारळ (208.04)2(.99%), सोयाबीन (38214.99)19124.20(50.4%), कापुस (70)12(17.14%)

 
Top