उस्मानाबाद /प्रतिनिधी-
लोक कल्याणकारी राजे, आरक्षणाचे जनक, महान राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी (दि.६) राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीच्या वतीने प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक येथे स्मारक समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे व सचिव बालाजी तांबे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. कोरोना रोगामुळे अत्यंत साधेपणाने व सोशल डिस्टन्स पाळून अभिवादन करण्यात आले.

 
Top