उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात कामासाठी आलेले उत्तर प्रदेशचे तरुण लॉकडाऊनमुळे हाताला कांही कामधंदा मिळत नसल्यामुळे व उपासमार होत असल्यामुळे ते रात्रीच्या वेळी पायी मार्ग काढत आप-आपल्या गांवी जाण्याचा केवीळवाणा प्रयत्न करीत असतांना दिसत आहेत.याकडे प्रशासनाने लक्ष देऊन अशा लोकांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.
 दि. 6 मे 2020 रोजी असेच कांही तरूण युवक उस्मानाबाद-रूईभर मार्गे जात होते. यावेळी रूईभर येथील हॉटेल शेतकरी ढाब्याचे मालक गोरोबा बंकट चव्हाण यांना या तरुणांनी आपली अडचण सांगून मदत करा, अशी विनंती केल्यानंतर तत्काळ गोरोबा चव्हाण यांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करून त्यांना पोटभर जेवण खाऊ घालून त्यांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यावेळी या तरुणांनी रूईभर येथील शेतकरी हॉटेल (ढाबा) चे मालक गोरोबा बंकट चव्हाण यांचे आभार मानले. गरजवंताच्या मदतीला धावून गेलेल्या गोरोबा चव्हाण यांचे व त्यांच्या शेतकरी हॉटेलचे परिसरात कौतुक होत आहे.
यावेळी प्रशांत चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते आकाश चव्हाण, नितीन भैय्या लोमटे ,संतोष चव्हाण ,अमोल आप्पा चव्हाण, वैभव चव्हाण, संदीप चव्हाण ,दयानंद वडवले,अनंत गडकर, बालाजी चव्हाण आदींची उपस्थिती होती. 
 
Top