तुळजापूर /प्रतिनिधी-
तुळजापूर शहरा मध्ये भवानी रोड पर चँनल गेट जवळ  असलेली  दोन दुकाने  दि.२१ गुरुवार रोजी दुपारी ३. ३० वाजण्याच्या सुमारास शॉट सर्किट मुळे लागलेल्या आगीत जळून खाक होणेची घटना घडली.
या बाबत सविस्तर वृत असे की, तुळजापुर येथील भवानी रोड वरील न.प.चे चँनल गेट जवळ असलेल्या बालाजी मारुती गायकवाड (रा.तुळजापुर) यांचे श्री स्वामी सयर्थ कँसेट दुकान व शुभम शञगुन राऊत (रा.तुळजापुर)  यांचे जनरल स्टोअर्स खेळणी व श्री देवीचे माळ-परडी सामान असलेले हे दोन्ही दुकान जवळ,जवळ चिटकून असल्याने लागलेल्या आगीत जळुन खाक झाले. या आगीमध्ये बालाजी गायकवाड यांच्या दुकानातील सामान , २ लँपटाँप , १ काँप्युटर, १ टि.व्ही,  १ फ्रिज व कँसेट हाऊस, मेमरी कार्ड साहित्य, कोल्ड्रींग साहित्य आदीसह वस्तु जागीच जळुन खाक झाले व त्याच बाजुला असलेल्या शुभम राऊत यांच्या दुकानात श्री तुळजाभवानी स्टेशनरी खेळणी व जनरल स्टोअर्स साहित्य,  श्री देवीच्या माळ परडीचे  आदीसह इतर वस्तु जळुन खाक झाले.या साँटसर्किट मुळे लागलेल्या आगीत बालाजी गायकवाड यांचे  दोन ते अडिच लाखाचे नुकसान झाले तर शुभम राऊत यांचे   एक ते दीड लाखाचे नुकसान झाले.अचानक साँट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन्ही दुकानाचे मोठे नुकसान झाले.
  ही आग विझविण्यासाठी तेथील स्थानिक नागरीकांनी मोठा प्रयत्न केला त्यानंतर ही आग विझविण्यासाठी तुळजापुर न.प.ची अग्नीशामक दलाची गाडी आली आणि ही आग विझविण्यात यश आले विशेष म्हणजे दुकाना मागे म.रा.वि.मंडळाची डि.पी.आहे त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

 
Top