कळंब /प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील हावरगाव येथे कोरोना बाधित दोन रुग्ण आढळल्याने गावास खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, कळंब-उस्मानाबाद चे आ. कैलास घाडगे-पाटील, उपविभागीय अधिकारी  अहिल्या गाठाळ  यांनी भेट देऊन आवश्यक त्या उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या.
प्रामुख्याने रुग्णांवर स्थानिक पातळीवर तातडीने उपचार व्हावेत.प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाण्याऱ्या व आत येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी, या झोनमधील लोक कामाशिवाय बाहेर जाता कामा नये. संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.
यावेळी तहसीलदार सौ.मंजुषा लटपटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाधव, शिवसेना शहरप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, सरपंच चक्रधर कोल्हे, आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 
Top