कळंब (प्रतिनिधी) -
सध्या देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्वचजण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. लहान मुलांसह वृद्धांपर्यंत आज सर्वच सोशल मीडियाशी जोडला गेला आहे. मोठ्याप्रमाणात त्याच्यावर वेळ घालवत आहे. त्यामुळे घरातच बसून आपल्यातल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आगाज फाउंडेशन आणि आझाद ग्रुप कळंब यांच्यावतीने ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत.
या स्पर्धेत नृत्य, गायन, काव्यवाचन, एकपात्री नाटक, मिमिक्री या कलाप्रकारचे 3 ते 5 मिनिटांचे व्हिडिओ तयार करून संयोजकांकडे पाठवायचे. आगाजच्या युट्यूब चॅनेलवर सर्वाधिक लाईक्स मिळणाऱ्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक आणि ट्रॉफी दिली जाणार आहे. प्रथम 5 हजार, द्वितीय 4 हजार, तृतीय 3 हजार, चतुर्थ 2 हजार तर 5 व्या क्रमांक वाल्याला 1 हजार रुपये आणि ट्रॉफी दिली जाणार आहे. स्पर्धकांनी 31 मे पर्यंत आपले व्हिडिओ पाठवायचेत.  31 मे नंतर पारितोषिक जाहीर केले जातील. त्याचबरोबर या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणत्याही वयाची अट संयोजकांनी घातलेली नाही. त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं, असं आवाहन आगाज फाउंडेशन आणि आझाद ग्रुपच्यावतीने करण्यात आलं आहे.

 
Top