नळदुर्ग/प्रतिनिधी-
सलग दुसऱ्या दिवशी नळदुर्ग पोलिसांनी धाडसी कारवाई करीत हातभट्टी दारू गाळपसाठी प्रसिद्ध असलेल्या पाटील तांड्यावर धाड मारून तेथील हातभट्ट्या उध्वस्त करण्याबरोबच गुळ मिश्रीत रसायन व तयार हातभट्टी दारू असा एकुण ३ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हातभट्टी दारू गाळप करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
सदरील कारवाई तुळजापुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरांतुन स्वागत होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे या लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारची दारू दुकाने व दारू विक्री पुर्णपणे बंद आहे असे असतांना नळदुर्ग पोलिस ठाणे हद्दीतील पाटील तांड्यात मात्र राजरोसपणे हातभट्टी दारू गाळप करण्याचा प्रकार सुरू होता. याठिकाणी गाळप होणारी हातभट्टी दारू अनेक गावांत पोहोचविण्यात येत होती. वास्तविकपाहता पाटील तांडा हा हातभट्टी दारू गाळप करण्यासाठी प्रसिद्ध आहे. कायदा किंवा पोलिसांना न जुमानता याठिकाणी हातभट्टी दारू गाळप केली जात होती. मागे याठिकाणी पोलिस कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर कांही आरोप करण्यात आले होते त्यामुळे पाटील तांड्यावर पोलिस कारवाई करतांना थोडा विचार करतात. गेल्या अनेक वर्षात पाटील तांड्यात सुरू असलेल्या हातभट्टी दारू गाळपावर मोठी कारवाई झाली नव्हती त्यामुळे येथील हातभट्टी दारू गाळप करणाऱ्यांची मस्ती वाढली होती. लॉकडाऊनच्या काळातही पाटील तांड्यात मोठयप्रमानात हातभट्टी दारू गाळप सुरू असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे व नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे यांनी पाटील तांड्यावर धाड घालण्याचा धाडसी निर्णय घेतला.
दि.७ मे रोजी सकाळी ६.१५ वा. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्यासह नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे, सहायक पोलिस निरीक्षक रोडगे, पोलिस उपनिरीक्षक कैलास लहाने, पोलिस हवालदार राठोड, बांगर, पोलिस नाईक सुरवसे, पोकॉ. हजारे, वाघमारे यांच्यासह पोलिस मुख्यालयातील ३० पोलिस कर्मचाऱ्यांनी पाटील तांड्यावर धाड घातली. यावेळी तांड्याजवळील शेतात छापा मारला असता तेथे शंकर नुरा राठोड, हरिश्चंद्र टिकाराम जाधव, विकास गोविंद राठोड, श्रीमंत धनु पवार सर्व रा. पाटील तांडा यांनी आपल्या कब्जात गुळ मिश्रीत रसायन व गावठी हातभट्टी दारू असा एकुण ३ लाख ३६ हजार रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी वरील सर्व आरोपींविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात पाटील तांड्यावर आशा प्रकारची मोठी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे व नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे यांच्या धाडसी निर्णयामुळेच हे शक्य झाले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरांतुन स्वागत होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी नळदुर्ग पोलिसांनी धाडसी कारवाई करून अवैध धंदे करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
 
Top