नळदुर्ग  /प्रतिनिधी-
 नळदुर्ग येथील कुरेशी गल्ली येथे खुलेआम अवैधरित्या सुरू असलेल्या जनावरांच्या कत्तलीचा पर्दाफाश दि.६ मे रोजी उस्मानाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला असुन भल्या पहाटे याठिकाणी धाड घालुन जिवंत २० जनावरांसह कापलेल्या जनावरांचे मास असे एकूण ५ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असुन याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे नळदुर्ग शहरवासीयांनी स्वागत केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सर्व प्रकारची काळजी घेत आहे असे असतांना नळदुर्ग शहरातील कुरेशी गल्ली येथे खुलेआम अवैधरित्या जनावरांची कत्तल करून त्याचे मास बाहेर पाठविण्याचा उद्योग सुरु होता. आज राज्यात गोहत्त्या बंदी कायदा लागु आहे मात्र याठिकाणी याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात होते. नळदुर्गचा कत्तलखाना गेल्या अनेक वर्षापासून न.प.ने बंद केला आहे. कत्तलखाना बंद असतांनाही याठिकाणी दररोज मोठयप्रमानात जनावरांची कत्तल केली जात होती. लॉकडाऊनच्या काळातही नळदुर्ग येथे मोठयप्रमानात जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन व अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दगुभाई शेख, पोलिस उपनिरीक्षक अण्णा खाडेवाड,पोहेकॉ किशोर शेळके, पोलिस नाईक कुणाल दहिवडे, पोकॉ बलदेव ठाकुर, पोकॉ दीपक लाव्हरे पाटील व चालक संतोष गव्हाणे यांनी दि.६ मे च्या भल्या पहाटे कुरेशी गल्ली येथे सुरू असलेल्या अवैधरित्या सुरू असलेल्या जनावरांच्या कत्तलीच्या ठिकाणी धाड घातली. यावेळी याठिकाणी कांही जनावरांची कत्तल करण्यात आली होती तर कांही जनावरे अद्याप जिवंत होती. पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला यावेळी मोठयप्रमानात जनावरांचे मास पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस वेळेवर त्याठिकाणी पोहचले नसते तर या २० जनावरांचीही कत्तल झाली असती. जप्त करण्यात आलेल्या २० जनावरांमध्ये गायींचाही समावेश आहे यावरून याठिकाणी गो व गोवंश हत्त्या होते हे स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे.
पोलिसांनी याठिकानाहुन २० जिवंत जनावरांसह जनावरांचे मास असे एकूण ५ लाख ८९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुश्ताक चाँदसाब कुरेशी, महेबुब सादिक कुरेशी, रजाक चाँदसाब कुरेशी, सादिक अब्दूलसत्तार कुरेशी, मुनीर नशीर कुरेशी, शब्बीर अब्दुल अजीज कुरेशीव मुदस्सर गफार कुरेशी या सात जणांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असुन एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी याठिकाणी वारंवार कारवाई करण्याची गरज असुन कायदा पायदळी तुडवून खुलेआम अवैधरित्या जनावरांची कत्तल करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धाडसी कारवाईचे नळदुर्गवासियांनी स्वागत केले आहे.पोलिसांच्या सतर्कतेमुळे २० मुक्या जनावरांचे प्राण वाचले आहे.
 
Top