उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथील मानव अधिकार व सामाजिक न्याय शिष्टमंडळ यांच्यावतीने सोशल डिस्टन सिंग पाळून  गरजूंना किराणा किटचे   वाटप आज रोजी दिनांक 19 5 2020 रोजी मानव अधिकार व सामाजिक न्याय शिष्टमंडळ यांच्यावतीने गरीब व गरजू मजूर लोकांना साखर, चहा पत्ती, कपड्याचे साबण ,निर्मा, पेस्ट , हळद, मीठ , खोबरे,  पामतेल ,असे एकूण बारा किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी मानवाधिकार संस्थेच्या जिल्हाध्यक्ष  जीनत प्रधान व डॉक्टर तबस्सुम सय्यद , अकबर पठाण,  निलेश प्रधान, बसीर तांबोळी,  मनीषा वाकडे इत्यादी उपस्थित होते. 

 
Top