उस्मानाबाद /प्रतिनिधी-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर उस्मानाबाद येथील व्यवस्थापन शास्त्र विभागा मार्फत उपपरिसरातील विद्यार्थासाठी वेबिनार दि. 29 एप्रिल रोजी आयोजित केला होता. सदर वेबिनारला प्रमुख वक्त्या सिमबॉयसिस विद्यापीठ पुणे येथील प्राध्यापिका व कार्पोरेट ट्रेनर डॉ. प्रिया ईराबत्ती- गांधी उपस्थित होत्या. वेबिनार हा “तणावात आपली उत्पादण क्षमता कशी जोपासावी” या विषया वरती  आयोजित केला होता. सध्या शारीरिक, मानसिक स्थैर्य ठेऊन आपण विविध मार्गानी नवीन गोष्टी शिकत आहोत डिजिटल माध्यमे वापरणे, सहनशीलता, आपल्या स्वताचे परीक्षण करण्यासाठी व चुका सुधारून पुढे जाण्यासाठी या वेळेचा उपयोग घरी राहून केला पाहिजे. लॉकडाउन मधील काळात आपल्या क्षमता वाढविण्यास संधी आहे असे प्रतिपादन डॉ. प्रिया ईराबत्ती- गांधी यांनी केले.
 लॉकडाउन मध्ये विद्यार्थी हे शैक्षणिक परिसरापासून दूर आहेत. त्यांना ऑनलाइन एकत्र आणून तनावमुक्ति, अभ्यास, जगात बदलणार्‍या गोष्टी, शिक्षणात होणारे बदल या विषयावरती मार्गदर्शन झाले. विविध प्रश्न विद्यार्थी यांनी शेवटी विचारले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात असणार्‍या शंकांचे देखील समाधान त्यांनी केले. उपपरिसरातील जल व भूमी विभाग, रसायनशास्त्र विभाग, शिक्षणशास्त्र विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, इंग्रजी विभाग, नाट्य विभाग व व्यवस्थापन शास्त्र विभातील विद्यार्थी उपस्थित होते. या वेबिनारची सुरुवात व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांनी लॉकडाउन मधील विभागातील कार्य व पाहुण्यांच्या परिचयाने केली.  सदर वेबिनार साठी वेबिनार समन्वयक डॉ. विक्रम शिंदे यांनी मेहनत घेतली. तसेच सह समन्वय प्रा. सचिन बस्सैये व प्रा. वरुण कळसे यांनी सहकार्य केले. वेबिनार साठी जल व भूमी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नितिन पाटील व नाट्य विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद माने, विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते. सदर वेबिनारचे आयोजन मा. कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले, प्र कुलगुरू प्रा. डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव प्रा. डॉ. जयश्री सूर्यवंशी, वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्टाता प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे, औरंगाबाद येथील व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक प्रा. डॉ. अभिजीत शेळके व उप-परिसर संचालक प्रा. डॉ. प्रशांत दिक्षित यांच्या मार्गदर्शना खाली केले.

 
Top