उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्ह्यातील 96 हजार 261 उज्जवला गॅस कनेक्शन धारकांना मोफत गॅस रिॅफिलचा लाभ होणार असून यापैकी जवळपास 84 हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आगावू रक्कम  जमा करण्या्त आली आहे. सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीत गरीबांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांना गॅस रिफिल भरण्या‍साठी पैसे उपलब्ध  होत नसल्या‍चे समोर आले होते. या परिस्थितीत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने एप्रिल,मे, जुन 2020 या तीन महिन्यात मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेत गॅस कनेक्शन धारकांना या मोफत गॅस रिफिल योजनेचा लाभ मिळणार आहे.
 या योजनेचा भाग म्हणुन केंद्र सरकारने उस्मानाबाद जिल्हयातील 96 हजार 261 उज्जवला गॅस कनेक्शन धारकापैकी जवळपास 84 हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिल्या महिन्याच्या  गॅस रिफिलचे पैसे जमा केले आहेत. उर्वरीत ग्राहकांच्या‍ खात्यात टप्प्या टप्पात   ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. ग्राहकांनी त्यांच्यां खात्यावर गॅस रिफिल साठी पाठवलेली रक्कम काढुन नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून नोंदणी करून गॅस रिफिल भरून घ्यायाचे आहे. पहिल्या् महिन्याचा गॅस सिलिंडर भरून घेतल्या नंतर दुस-या सिलिंडर चे पैसे मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात खात्यात जमा करण्यात येणार आहेत व दुसरे सिलिंडर भरून घेतल्या नंतर तिस-या सिलिंडरची रक्कम जुनच्या  पहिल्या आठवडयात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत तीन महिन्यात तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. एका महिन्यात एक सिलेंडर याप्रमाणे ग्राहकांना लाभ मिळेल. या योजनेचा लाभ जिल्हयातील सर्व उज्जवला गॅस कनेक्शन धारकांना मिळणार असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन  गॅस कंपनीचे उस्माननाबाद जिल्हा नोडल अधिकारी नितिन खोत ( मो. नं. 8850428501 )  यांनी केले आहे.
 
Top