उस्मानाबाद/प्रतिनिधी -
उस्मानाबाद जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व गोर गरीब कुटुंबान दररोजच्या अन्नाची सुविधा व्हावी यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी उस्मानाबाद जिल्हयास शनैश्वर देवस्थान व मूळाबाजार यांच्या सयुक्त विद्यमानाने शनिशिंगणापूर  संस्थे कडून उस्मानाबाद जिल्हयास 25 टन धान्य उपलब्ध करून दिले आहे.   त्यामध्ये 10 टन तांदूळ, 10 टन तुरदाळ व साखर 5 टन  दिले असून सदरील धान्य 5 हजार  कुटुंबाना 2 किलो तांदुळ,2 किलो ज्वारी, 1 किलो तुरदाळ, अर्धा किलो साखर वाटप करण्यात येणार असून.जिल्हयातील उमरगा मतदार संघातील 1 हजार 500 कुटुंबाना, उस्मानाबाद मतदार संघातील 1 हजार 500 कुटुंबाना, तुळजापूर मतदार संघातील 1 हजार कुटुंबाना, भूम-परंडा मतदार संघातील 1 हजार कुटुंबाना वाटप करण्यात येणार आहेत.
हे सर्व साहित्य महसूल भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे माल उतरुन घेण्यात आला.यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, तहसिलदार गणेश माळी, सहाय्यक नियोजन अधिकारी सोमनाथ रेडडी, नगर परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी बाबासाहेब मनोहरे, पुरवठा नायब तहसिलदार केरूलकर,पालमंत्रयाचे स्वीय सहाय्य्क श्रध्दानंद पाटील,OSD रितापूरे डी.बी.अदिसह महसूलचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top