उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मराठवाडा पदविधर मतदार संघाची निवडणुक तोंडावर आली असताना पदविधर मतदारांच्या नोंदणीमध्ये मात्र, जिल्हयात ८ हजार मतांनी घट झाल्याचे समोर आले आहे.
मराठवाडा पदविधर मतदारांची निवडणुक लवकरच लागणार आहे. २०१४ च्या पदविधर मतदार संघ निवडणुकीसाठी उस्मानाबाद जिल्हयात ३९ हजार ८१४ पदविधर मतदारांची नोंदणी झाली होती.  विशेष म्हणजे पदविधर मतदार संघाच्या २०२० च्या निवडणुकीसाठी पहिली मतदार यादी रद्द करून नव्याने मतदार यादी तयार करण्याचे काम झाले आहे. ३ मार्च २०२० पर्यंत जिल्हयात एकूण ३२ हजार १६४ मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात ९ हजार २८७, तुळजापूर   ४ हजार ३६५ उमरगा  ५ हजार २३२, लोहारा २ हजार ५६०, कळंब ४ हजार ४४३, भूम २ हजार ३२८, वाशी १ हजार ८८५, परंडा २ हजार ६४ या प्रमाणे जिल्हयात पदविधर मतदारांची नोंदणी झाली आहे.
ऑनलाईन नोंदणी सुरू
पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणुक उपजिल्हाधिकारी हे सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणून काम करतात, अशा प्रकारची माहिती देऊन पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हयात गतवर्षी पेक्षा ८ हजार पदविधर मतदारांची कमी नोंदणी झाली असली तरी पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या १ दिवस अगोदरपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे, त्यामुळे मतदारात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही
-डॉ. प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी निवडणुक विभाग, उस्मानाबाद

 
Top