उस्मानाबाद/प्रतिनिधी-
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर च्या व्यवस्थापक मंडळाच्या सदस्यपदी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांची कोल्हापूर येथील संस्था, मुख्य कार्यालयात काल दि.28 फेबु्रवारी रोजी करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून ही काम करताहेत.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाला खुप महत्वाचे मानले जाते. संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत या शाखांचे नियोजन,सुधारणा,बदल करण्याचा अधिकार हा व्यवस्थापक मंडळाला असतो.या व्यवस्थापक मंडळातील सदस्यपदी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या रूपाने मराठवाड्याला संस्थेने स्थान दिल्याने मराठवाड्यातील संस्था शाखात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आज दि.29 फेबु्रवारी रोजी सकाळी  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील सर्व स्टाफच्या वतीने प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचा सत्कार प्रा.डॉ.ए.बी.इंदलकर यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी प्रा.डॉ.डी.वाय.इंगळे, प्रा.डी.एम.शिंदे, प्रा.डॉ.केशव क्षीरसागर, प्रा.शिवाजी गायकवाड, प्रा.राजा जगताप,प्रा.स्वाती बैनवाड, प्रा.विकास सरनाईक उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातील विज्ञान विभाग,ग्रंथालय विभाग, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 
Top