उस्मानाबाद/प्रतिनिधी-
लोकमंगल फौंडेशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात यंदा 35 वधूंचे लोकमंगल समूहाचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख, फौंडेशनचे कार्याध्यक्ष रोहन देशमुख यांनी कन्यादान केले. सोहळ्यात जिल्ह्यासह विविध ठिकाणाहून आलेल्या हजारो व-हाडींच्या भोजन व्यवस्थेसह विवाह सोहळयात रक्तदान शिबिरही आयोजित केले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना शुभशीर्वाद दिला.
विवाह सोहळयात आमदार सुभाष देशमुख, युवा नेते रोहन देशमुख, अरविंद जोशी, वक्ते गणेश शिंदे, रामराजे पाटील, सोलापूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माऊली महाराज, अविनाश महागावकर, रामदास कोळगे, बप्पा देशमुख, प्रताप देशमुख, प्रभाकर मुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, शिवदास कांबळे, उस्मानाबाद पंचायत समितीच्या सभापती हेमलता चांदणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्यातील 35 वधू-वरांना शुभशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
भाजपा पदाधिका-यांची पाठ
भाजपाचे माजीमंत्री सुभाष देशमुख यांनी  वधू-वरांचा सामुहिक विवाह धुमधडाक्यात लावून दिले. मात्र या सामुहिक विवाहसोहळ्याप्रसंगी जिल्हयातील भाजपा पदाधिकारी नव वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी फिरकले नाहीत. त्यामुळे भाजपामधील गटबाजी परत एकदा समोर आली आहे. ऐन निवडणुकीमध्ये सुभाष देशमुख गट जिल्हयातील तुळजापूर व अन्य विधानसभा मतदार संघावर दावा सांगतो, त्यामुळे ही गटबाजी होत असल्याचे समजते.
 
Top