उस्मानाबाद/प्रतिनिधी-
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठी विभागाने "1 ते 15 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त मुंबई येथील सुप्रसिध्द गझलकार  चंद्रशेखर सानेकर व गझलकार गोविंद नाईक यांच्या "गझलधारा"कार्यक्रमाचे महाविद्यालयात दि.8 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख होते. प्रारंभी मान्यवरांनी डॉ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमाचे पूजन केले.यावेळी गझलकार गोविंद नाईक म्हणाले की गझल ही रसिकाच्या काळजाला भिडत असते.ती प्रेक्षकांना घायाळ करते व माणसाला विचार करायला भाग पाडते यांवेळी त्यांनी कांही स्वत:च्या गझला गायील्या तेंव्हा विद्याथ्र्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
यावेळी त्यांनी "कोणता वारा तुझ्यावर भाळला, वाढते आहे तुझी सळसळ पुंन्हा" ही गझल गाईली. त्याचबरोबर "अरे आजार माझा गंभीर नाही, जगाच्या सांतवनाला जरा ही धीर नाही" या गझलेणे विद्याथ्र्याना मंञमुग्ध केले.   चंद्रशेखर सानेकर यांनी यावेळी अनेक गझला सादर केल्या. यावेळी त्यांच्या या गझलेला खुपच दाद मिळाली
प्रास्ताविक प्रा.शिवाजी गायकवाड यांनी केले. सूञसंचालन अरविंद हंगरगेकर यांनी केले.आभार प्रा.राजा जगताप यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी —विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top